पुणे / वार्ताहर :
इंदापूर येथे एका कीर्तनकाराला पोलिसाने मुलीला कॉल करतो, असे म्हणून मारहाण करत त्याला धमकावले होते. हा अपमान सहन न झाल्याने या कीर्तनकाराने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला आणि त्याच्या मित्राला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा दखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे.
संजय मोरे असे आत्महत्या केलेल्या कीर्तनकाराचे नाव आहे. त्याने शनिवारी (दि 10) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मोरे यांची बहीण हिने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महादेव जाधव आणि त्याच्या एका अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : पुण्यात वर्षाअखेरीस रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्तनकार संजय मोरे यांना गुरुवारी (दि 8) महादेव जाधव आणि त्याच्या एका साथीदाराने संजय मोरे यांच्या घरी जाऊन एका महाराजांच्या मुलीला फोन का करतोस?, असे म्हणत मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली होती. या पूर्वीही इंदापूर येथील देशपांडे व्हेजजवळ असलेल्या तापी बिल्डिंग येथे नेऊन त्याला ‘तू महाराजांच्या मुलीला फोन का करतो’, या कारणावरुन मोरे यांना मारहाण केली होती. या नंतरही मोरे यांना हे दोघे वारंवार धमकी देत होते. त्यांच्या या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संजय मोरे याने शनिवारी आत्महत्या केली. या दोघांच्या त्रासामुळे संजय मोरे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे संजय मोरे यांची बहीण अश्विनी मोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यावरुन पोलीस संजय जाधव आणि त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरच्या इसमाची पुण्यात आत्महत्या
जमीन विक्रीतून आलेली 99 लाखांची रक्कम न देता फसवणूक करीत खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी भावाने दिल्यामुळे एकाने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना 11 ऑगस्टला विश्रांतवाडीत घडली. वसंत अनंत कोदे आणि संभाजी जगन्नाथ कणसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महादेव मधुकर कोंदे (वय 40 रा. माळशिरस, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रमिला मधुकर कोदे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.









