औषधांच्या दुरुपयोगाबाबत केली चर्चा
बेळगाव : नशामुक्त बेळगावसाठी बुधवारी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे एसीपी निरंजन राजे अरस हेही उपस्थित होते. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत अन्नसुरक्षा व औषध विभागाचे अधिकारी, होलसेल व रिटेल औषधविक्रेते, दुकानदार आदींनी भाग घेतला होता. यावेळी औषधे व त्यांच्या दुरुपयोगाची शक्यता याविषयी चर्चा करण्यात आली. औषध विक्रेत्यांनीही या चर्चेत भाग घेऊन सल्ले दिल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.









