अनेक संशयितांसह वाहने ताब्यात रात्री उशिरापर्यंत संशयितांवर गुन्हे
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील प्रतापसिंहनगरात शुक्रवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व त्यांच्या पथकाने कोम्बिग ऑपरेशन केले. या ऑपरेशनमध्ये अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच येथून अनेक वाहनेही ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. कोम्बिग ऑपरेशनदरम्यान जुगाराच्या अड्डय़ावर छापा टाकून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची रात्री उशिरापर्यंत
सातारा जिह्यात अवैध धंद्यावर टाच आणण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कारवाईचा धडाका सुरु ठेवला आहे. यामुळे जिह्यात गुन्हेगारीचा आलेख चढत आहे. अनेक अवैध धंदे बंद करण्यासाठी शहर पोलिसांनी प्रतापसिंहनगरात शुक्रवारी कोम्बिग ऑपरेशन केले. या ऑपरेशनवेळी पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व 25 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱयांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. यावेळी प्रतापसिंहनगरमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच 25 संशयित वाहने ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. संशयित इसमांनाही ताब्यात घेतले आहे. या ऑपरेशनमुळे अनेक बडय़ा धेंडय़ाचे धाबे दणाणले आहेत. गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक शेख यांनी ठोस कारवाईचे आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक ते कर्मचारी ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. अशा कारवाई सातत्याने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सर्वत्र कोम्बिग ऑपरेशन राबवणार
ग्रामपंचायत निवडणूक व वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी सर्वत्र असे कोंबिग ऑपरेशन राबवणार आहे. या ऑपरेशनमध्ये अनेक कारवाई करत मुद्देमाल हस्तगत केला आहे. काही सराईत गुन्हेगार ही मिळून आले आहेत.
भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक
चोरटाही घेतला ताब्यात
शुक्रवार 5.30 ते 7.30 असे दोन तास शहर पोलिसांनी प्रतापसिंहनगरात कोम्बिग ऑपरेशन केले. यावेळी एक वाहन चोरी करणारा चोरटा व महावितरणच्या ऍल्युमिनीयमच्या तारा चोरणारा चोरटा ताब्यात घेतला आहे. पोलिसांना आणखी मुद्देमाल हाती आला असून पुढील चौकशी करुन गुन्हा दाखल करत योग्य ती कारवाई करण्यात येणार असाल्याचे पोनि निंबाळकर यांनी सांगितले.








