अवैध मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी प्रतिनिधी
शहरातील संसारे उद्यानासमोरील परिसरात अवैधरित्या चालणाऱ्या जुगारावर शहर पोलिसांकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली यावेळी जुगार चालवणाऱ्या दोघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.बिलाल दिलावर शहा व दिलीप वसंत धनावडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संसारे उद्यानासमोरील जागेत अवैधरित्या जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती .त्यानुसार 15 जुलै 2023 रोजी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली .यावेळी संशयित आरोपी हे अवैधरित्या जुगार चालवत असल्याचे पोलिसांना आढळले त्यानुसार त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आली.
अशी कारवाई गेले दोन आठवडे पोलिसांकडून सुरू आहे. मात्र ही कारवाई कौतुकास्पद असली तरी शहरात सुरळीत चालू असलेल्या मोठ्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून कारवाई होताना दिसून येत नाही आहे. केवळ छोट्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून केवळ नागास नग संशयित आरोपी ताब्यात घेतले जात आहेत. मात्र मुळ मालक बाजूलाच राहत आहेत अशी कुजबुज सुरु आहे.