वृत्तसंस्था/ दुबई
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सीडेड इगा स्वायटेक तसेच बार्बोरा पेसिकोव्हा यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. स्वायटेकने अमेरिकेच्या कोको गॉफचा तर क्रिसिकोव्हाने अमेरिकेच्या पेगुलाचा पराभव केला.
शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात टॉप सीडेड इगा स्वायटेकने अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. दुसऱया उपांत्य सामन्यात बार्बोरा पेसिकोव्हाने उपांत्य लढतीत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचे आव्हान 6-1, 5-7, 6-0 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेत पेसिकोव्हाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेलारुसच्या 24 वषीय साबालेंकाला 0-6, 7-6 (7-2), 6-1 असे पराभूत करत उपांत्यफेरी गाठली होती. पेसिकोव्हाने 2021 साली या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.









