वृत्तसंस्था/ वॉरसॉ (पोलंड)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या बीएनपी पेरीबस वॉरसॉ खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने एकेरीचे अजिंक्यपद मिळविताना सिगमंडचा अंतिम सामन्यात पराभव केला. 2023 च्या टेनिस हंगामातील स्वायटेकचे हे चौथे विजेतेपद आहे. स्वायटेकच्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे 15 वे एकेरीचे अजिंक्यपद आहे. चालू हंगामात स्वायटेकने डोहा, स्टुटगार्ट आणि रोलँड गॅरो टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात स्वायटेकने सिगमंडचा 6-0, 6-1 असा फडशा पाडला.









