वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट (जर्मनी)
पोलंडची टॉप सिडेड महिला टेनिसपटू इगा स्वायटेकने येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील स्टुटगार्ट खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकावताना बेलारुसच्या साबालेंकाला पराभूत केले.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वायटेकने साबालेंकाचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले. स्वायटेकने अलिकडच्या कालावधीत सलग दुसऱ्यांदा साबालेंकचा पराभव केला आहे. या स्पर्धेत साबालेंकाला तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभव पत्कारावा लागला आहे.









