Poha Crispy Thalipeeth : सकाळचा पोटभर नाश्ता करायचा म्हटलं की आपल्याला आठवतात ते कांदापोहे आणि गरमागरम मस्त असा चहा. पोहे दिवसभरात कधाही खायला मिळाले तर ताव मारणारे अनेकजण आपल्याला पाहायला मिळतील. मात्र अनेकांना पोहे खाल्ले की पित्त होत असं वाटतं. पण पोटभर नाश्ता कोणता असेल तर तो पोहे. पण कधी-कधी सतत पोहे खाल्याने त्याचा कंटाळा येतो. अशावेळी पोह्यापासून तुम्ही अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता आणि खाऊ घालू शकता. आज आपण पोह्याचे खमंग व खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसीपी.
साहित्य
पोहे १ वाटी
गव्हाची पीठ अर्धी वाटी
बेसन पीठ अर्धी वाटी
कांदा- १
कोथिंबीर आवडीनुसार
हळद पाव चमचा
तिखट १ चमचा
ओवा पाव चमचा
हिंग पाव चमचा
तीळ एक चमचा
मीठ गरजेनुसार
वाटण करण्यासाठी
हिरवी मिरची- २
लसूण पाकळ्या- ८-१०
धने पाव चमचा
जिरे पाव चमचा
कढीपत्ता पाने- ८-१०
कृती:
सुरवातीला पोहे स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर दहा मिनिटे त्याला भिजत ठेवा. पोहे भिजेपर्यंत वाटण करून घ्या. यामध्ये लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिर्ची, जिरे,धने, आद्रक, कडीपत्ता पाने घालून वाटण करून घ्या. वाटण थोडं जाडसर वाटा. आता पोहे चांगले मळून घ्या. त्यानंतर त्यात गव्हाचं पीठ अर्धी वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी, बारीक चिरलेला एक कांदा, कोथिंबीर, वाटण, हळद पाव चमचा, तिखट एक चमचा, हिंग पाव चमचा, ओवा पाव चमचा, तीळ पाव चमचा, चवीनुसार मीठ घाला. यानंतर पीठ चांगले मऊसर मळून घ्या. पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा. पीठ मळून झाल्यानंतर १० मिनिटे झाकून ठेवा. यानंतर एखाद्या ताटावर किंवा पळपोटवर प्लॅस्टीकचा कागद ठेवून पसरा त्याला तेल लावून घ्या. आता पीठाचा गोळा करून घ्या त्याला थापून घ्या. थापल्यानंतर मधेमधे बोटाने छोटे छिंद्र करून घ्या. त्यानंतर अलगद तव्यावर टाकून खरपूस भाजून घ्या. ज्या-ज्या ठिकाणी छिंद्र आहे तेथे तेल सोडा म्हणजे म्हणजे चांगले खरपूस भाजेल. आता सर्व्ह करा.
टीप- पीठ मळताना जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करू नका. मऊसर पीठ मळा. घट्ट पीठाने थालीपीठ चांगल होत नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









