दररोज घरी नाश्त्याला पोहे,उपीट आणि शिरा हे पदार्थ तर ठरलेले असतात. मग कधीतरी इडली,आंबोळी ही केली जाते.पण तेच तेच पदार्थ खाऊन काही वेळेला कंटाळा येतो. यामुळे दररोजच्या नाश्त्यात बदल असायला हवा. शिवाय सकाळचा नाश्ता पौष्टिक देखील हवा.आज आपण अशाच झटपट चविष्ट आणि पौष्टिक नाश्त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
पोहे 2 वाटी
ओवा अर्धा चमचा
धने जिरेपूड १ चमचा
तिखट अर्धा चमचा
हळद पाव चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
मीठ
बटाटे ४
हिरवी मिरची ३
लसूण पाकळ्या ५ ते ६
आले
कोथिंबीर
तेल
कृती
सर्वप्रथम मिक्सर मध्ये २ वाट्या पोहे बारीक वाटून घ्यावेत.त्यानंतर त्यामध्ये ओवा, धने जिरेपूड,तिखट,हळद,गरम मसाला,आणि चवीनुसार मीठ हे सर्व पदार्थ घालावेत.यानंतर आले,लसूण आणि मिरची याची बारीक पेस्ट करून घ्यावी आणि ती पोह्याच्या पिठामध्ये घालावी.सर्व मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे.यानंतर बटाट्याची साले काढून घ्यावीत आणि त्याचे बारीक काप करून मिक्सरला ते वाटून घ्यावेत.बटाटयाचे मिश्रण आत्ता पोह्याच्या पिठामध्ये घालावे.तसेच त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व पीठ मळून घ्यावे. जर पीठ घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं पाणी घालून पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे. यानंतर त्याचे गोळे करून चपातीप्रमाणे लाटून तेल किंवा तूप लावून तव्यावर भाजून घ्यावेत. गरमागरम आणि चविष्ट पराठा तुम्ही दही किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









