सावंतवाडी/प्रतिनिधी
सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांचे शनिवार दि.८ रोजी सायं.५ वा.सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरून काव्यवाचन प्रसारित होणार आहे.कु.योगिता या नवोदित कवयित्री असून या बद्दल त्यांचे सिंधुदुर्गच्या साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कवयित्री योगिता शेटकर या गेले काही वर्ष निष्ठेने कविता लेखन करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध संस्थांच्या होणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमात त्यांनी आपले कविता वाचन केले आहे. त्यांच्या कवितेत जगण्याचे समग्र भान व्यक्त होत असून वर्तमानातील विविध अनिष्ट गोष्टींवर त्यांनी आपल्या कवितेमधून कठोर भाष्य केले आहे. तरी काव्य रसिकांनी त्यांच्या या काव्यवाचनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Articleआल्तिनो-म्हापसा येथे सलग 6 दिवस नळ कोरडे
Next Article पवारांचे आणखी तीन आमदार अजितदादांच्या गळाला?









