नवी दिल्ली : चीनी टेक कंपनी पोकोचा आज (22 डिसेंबर रोजी) पोको एम6 हा 5 जी स्मार्टफोन सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की हा स्मार्टफोन मीडीयाटेक डिमेशन्स 6100सह प्रोसेसर सोबत येणार आहे. शिवाय पोकोने अद्याप कोणत्याही फोनच्या इतर फिचर्स संदर्भात माहिती दिलेली नाही.
अंदाजे फिचर्स :
- डिस्प्ले : पोको एम 6 मध्ये कंपनीने 90 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले येणार
- कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनेलमध्ये डबल कॅमेरा सेटअप देण्यात येणार
- बॅटरी : पॉवर बॅकअपसाठी फोनला 5000 क्षमतेची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. मीडिया अहवालानुसार कंपनी 9,499 इतकी सुरुवातीची किमत असेल.









