उत्तर आणि पूर्व चीनमध्ये न्यूमोनियाच्या प्रादुर्भावामुळे मृतांच्या संख्येत अचानक मोठी वाढ होत चालली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव अद्याप संपलेला नाही, त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे.
मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स दर्शवतात की, चीनच्या रुग्णालयांमध्ये गोंधळ उडाला आहे आणि लोकांवर उपचार केले जात नाहीत. रुग्णालयात मोठी गर्दी असते. बरेच रुग्ण, मुलांच्या फुफ्फुसात गंभीर लक्षणं दिसत आहेत. कोरोनाच्या गंभीर संसर्गामध्येही अशीच लक्षणं दिसून आली. तर अमेरिकन वृत्तपत्र इवोच टाईम्सच्या मते, चीनच्या डालियान शहरातील स्मशानभूमीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ग्वांगझूमध्ये आकस्मिक मृत्यूची संख्या वाढली आहे. शांघायमध्येही मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. लोक सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाच्या किंवा शेजाऱ्याच्या मृत्यूबद्दल लिहित आहेत.