आमदार पी एन पाटील फंडातून नविन रस्ता व विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन
कसबा बीड/ प्रतिनिधी
कोगे ता. करवीर येथे आमदार पी एन पाटील यांच्या फंडातून नविन रस्त्याच्यासाठी 10 लाख निधी देण्यात आला. या नविन रस्त्याच्या व विकास कामांचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी श्री .पाटील यांनी कोगे गावाचे व पी एन पाटील यांचे जुने ऋणानुबंध आहेत , हे ऋणांनुबंध यापुढेही कायम राहणार आहे. आमदार पी एन पाटील यांच्या पाठीशी कोगे ग्रामस्थ ठाम आहेत. त्यामुळे कोगे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी आपले मनोगतात सांगितले.
या उद्घाटन कार्यक्रमांसाठी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुर्यवंशी यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून अनेक कामाचा पाठपुरावा करून आमदार पी. एन. पाटील यांच्या सहकार्याने कामे केली आहेत. तसेच कोगे गावांमध्ये मोठा आरोग्य दवाखाना होणेसाठी प्रस्ताव दिलेला आहे. लवकरच त्याची कार्यवाही होईल , त्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करूया असे आपले मनोगतात सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, माजी सभापती पंचायत समिती राजेंद्र सुर्यवंशी, ग्रामपंचायत सरपंच बनाबाई यादव, उपसरपंच नामदेव सुतार, बाळा भागोजी पाटील दूध संस्थेचे चेअरमन कृष्णात पाटील, शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य करण पाटील , संतोष पाटील (वाडा), संभाजी पाटील (संभाचा), निवृती संघाचे संचालक आनंदा रामा पाटील , राजाराम पतसंस्थेचे चेअरमन बळीराम चव्हाण , दादू रामा पाटील , बापू संतू पाटील , सर्जेराव घराळ, रघुनाथ पाटील, कॉन्ट्रक्टर रोहन पाटील आदी उपस्थित होते.