कोल्हापूर-राहुल गडकर
घरातील खराब झालेल्या आणि जीर्ण झालेल्या देवदेवतांचे फोटो, दिवंगत व्यक्तीचे फोटो नदीकाठी किंवा ओढ्याकाठी पडलेल्या आपल्याला दिसतात. पण हे खराब झालेले फोटो मूर्ती गोळा करून त्याचा पुनर्वापर करून त्यापासून मूर्ती तयार किंवा लगद्यापासून अनेक वस्तू तयार करण्याचे काम फुलेवाडीतील ऋग्वेदा मोरे फाउंडेशनकडून सुरू होते. त्याचे संस्थापक अध्यक्ष राजू मोरे यांनी हा उपक्रम कोल्हापुरातील पंचगंगा नदी, शिंगणापूर घाट, प्रयाग चिखली या ठिकाणी राबवला होता. त्याला समाजातूनही उदंड प्रतिसाद मिळाला. दैनिक तरुण भारत ने देखील या कार्याचा लेख प्रसिद्ध केला होता. तर दैनिक तरुण भारत च्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती देखील राजू मोरे यांच्या कार्याची दखल घेतली होती.
राजू मोरे यांच्या कार्याची दखल आता पीएमओ ऑफिस न देखील घेतली आहे. शुक्रवारी पीएमओ ऑफिस ने राजू मोरे यांना संपर्क करून त्याबाबतची माहिती त्यांना दिली. रविवारी सायंकाळी चार वाजता पीएमओ ऑफिस कडून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे.
आपल्या कार्याचा अभिमान मला सुरुवातीपासूनच होता. समाजातून त्याला पाठबळ मिळाल्यानंतर मनाला समाधान मिळत होते. दैनिक तरुण भारत ने माझ्या कार्याची दखल घेतल्यानंतर राज्यभरातून मला शुभेच्छा चे फोन आले. आता खुद्द पीएम ऑफिसने माझ्या कामाची दखल घेतल्याने मला नवी प्रेरणा मिळाली आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
-राजू मोरे, ऋग्वेदा मोरे फाउंडेशन अध्यक्ष









