संत तुकाराम शिळा मंदिर लोकार्पण
ऑनलाईन टीम/तरुण भारत
जगद्गुरू संत तुकाराम महाराज (sant tukaram maharaj) यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) आज देहू (dehu) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. पण संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना (ajit pawar) बोलू न दिल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी यावर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. तर राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून याचा निषेध करण्यात आला आहे.
अजित पवारांना शिळा लोकार्पण सोहळ्यात बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. देहूतल्या मंदिर शिळा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी भाषण केलं. पण या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी दिली नाही. यावरुन आता सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे. सुळे पुढे म्हणाल्या की, “प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही, हे अपमानास्पद असल्याचे त्या म्हणालया.
पंतप्रधानांनी केला इशारा, पण…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. यांनतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब पंतप्रधानांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.