मुंबई : शेतकऱ्यांसाठी खुशखबर पंतप्रधान किसान योजनेचा (PM kisan Yojna) ११ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसामध्ये प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या (Farmer)खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने शिमला (Shimla) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंन्द्र मोदी (Narendra Modi)यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अदा केली आहे. देशातील १० कोटी ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल २१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
आतापर्यंत देशभरातील तब्बल ५४ लाख शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सरकारचे ४ हजार ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे सर्तकता म्हणून पीएम किसान योजनेमध्ये बदल करण्यात आला आहे. योजनेतील अनियमितता लक्षात येताच यामधील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही याचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना/नागरीकांना नोटीस पाठवून ही रक्कम वसुल केली जाणार आहे.
हप्ता जमा झाला की नाही कसे बघाल
पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता येत्या दोन दिवसात जमा होणार आहे. तो जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्व प्रथम https://pmkisan.gov.in/ या केंद्राच्य अधिकृत वेबसाईटवर जावा. यामध्ये Beneficiary Status वर क्लिक करा. येत्याला पर्यायावर तुमचा आधारकार्ड क्रमांक टाका. तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.
पीएम किसान योजनेमध्ये झालेले बदल
निधीचा लाभ कुणाला घेता येऊ नये म्हणून 30 जुलै पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
डॉक्टर, इंजिनीअर यांनी अर्ज करुनही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
लोकसभा, राज्यसभा सदस्य, मंत्री, माजी मंत्री, महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यांना शेती असली तरी त्याचा फायदा होणार नाही.
राज्य किंवा केंद्र सरकारचे अधिकारी यांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









