ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे.यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना त्यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. X वरील पोस्टद्वारे त्यांच्या अभिनंदनात पंतप्रधान मोदींनी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेअर केलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “श्री शरद पवार जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो,” असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.









