वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान मोदींचा जन्माने मागास वर्गाशी (ओबीसी) संबंध नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींची मानसिकता ही मागास वर्गाच्या विरोधात आहे. गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे उच्चवर्णीय जातीचे होते असा दावा रेड्डी यांनी केला.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी तथ्यांवर आधारित वक्तव्यं करावीत. रेवंत रेड्डी हे इतके बेजबाबदार कसे बोलू शकतात असे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने मागास वर्गाच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली आहेत. मोदी यांच्या कार्यकाळातच मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. तर काँग्रेसच्या कार्यकाळात याकडे डोळेझाक करण्यात आली होती असा दावा जी. किशन रे•ाr यांनी केला आहे.
मोदी हे ज्या जातीचे सदस्य आहेत, त्या जातीला 1994 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात ओबीसी यादीत सामील करण्यात आले होते असा युक्तिवाद भाजप नेते के. लक्ष्मण यांनी केला आहे.









