PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (८ एप्रिल) तेलंगणातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.उद्घाटनावेळी त्यांच्यासोबत तेलंगणा भाजपचे अध्यक्ष संजय कुमार बंदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर नेते उपस्थित होते. या ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे साडेतीन तासांनी कमी होणार आहे.
ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर, पंतप्रधान मोदी एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर 11,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधानांच्या वेळापत्रकानुसार, ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) बीबीनगर आणि हैदराबादजवळ पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.
यात्रेकरूंना डोळ्यासमोर ठेवून ट्रेन चालवली
सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस ही तेलंगणातून तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दाखल होणारी दुसरी वंदे भारत ट्रेन आहे. ही रेल्वे हैदराबादला तिरुपती शहराशी जोडेल जिथे भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर आहे. ही रेल्वे सुरू झाल्याने दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे साडेतीन तासांनी कमी होणार आहे.विशेषत: यात्रेकरूंसाठी ही ट्रेन फायदेशीर ठरणार आहे.
तेलंगणात पंतप्रधान मोदींचा असा असेल दौरा
दक्षिणेकडील राज्यात पंतप्रधान मोदी सिकंदराबाद येथील परेड ग्राऊंडवर जाहीर सभेत सहभागी होतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणीही ते करणार आहेत. त्याच दिवशी हैदराबाद दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी तामिळनाडूला रवाना होणार आहेत. चेन्नई विमानतळावर एकूण 2,437 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे ते उद्घाटन करतील. याआधी एका ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले होते की नवीन टर्मिनलमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
Previous Articleमुंबईत 3 दहशतवादी दाखल; पोलीस नियंत्रण कक्षात फोन
Next Article बुकी अनिल जयसिंघानीला ईडीकडून अटक









