वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. शनिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली.
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. तसेच गेल्या 27 वर्षांमध्ये प्रथमच हा पक्ष दिल्ली राज्यात सत्तेवर आला आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसला शून्य जागा मिळण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.
आश्वासने पूर्ण करणार
निवडणूक काळात दिलेली सर्व आश्वासने माझे सरकार पूर्ण करणार आहे. यमुनेच्या स्वच्छतेचे काम विधानसभा निवडणुकीनंतरच हाती घेण्यात आले आहे. येत्या झ्ा़ाsपडपट्टीतील नागरीकांना पिण्याचे शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल याची दक्षता घ्या, असा इशारा त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला. कामाची पद्धती बदलावी लागेल. सर्व कामे वेगाने पूर्ण केली जातील, असे प्रतिपादन त्यांनी केले.









