2024 च्या निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी एकजूट करणाऱ्या देशातील सर्व विरोधी पक्षांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदी एकटेच पुरेसे असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मुंबईत एएनआयशी बोलताना आठवले यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी () मजबूत असल्याचेही म्हटले आहे.
आपल्या मुलाखतीमध्ये एएनआय शी बोलताना केंद्रिय मंत्री म्हणाले, “जर विरोधी पक्षांना एकत्र यायचं असेल तर ते येऊ शकतात. या सर्वांचा सामना करण्यासाठी एकटे पंतप्रधान मोदी पुरेसे आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए एक मजबूत सरकार आहे.” असेही ते म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीसंदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. बिहारच्या नेत्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. एप्रिलच्या अखेरीस विरोधी पक्षांची बैठक होणार असून नितीश कुमार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या बैठकिमध्ये संबोधन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.