ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भूतानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना काळात पंतप्रधान मोदींनी भूतानला केलेले सहकार्य, पाठिंबा अद्वीतीय आहे. मोदी इतर मुद्यांवरही भूतानला मदत करत असून, ते भूतानच्या Ngadag Pel gi Khorlo या सर्वोच्च नागरी पुरस्कारास पात्र आहेत. भूतानच्या जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन… मोदींचा भूतान भेटीचा एक फोटो शेअर करत मोदींना भूतान भेटीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
यापूर्वी सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती, रशिया, मालदीप आणि पॅलेस्टाईन या देशांनीही मोदींना त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.