ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद मोदी हेच कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ आहेत, असा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी केला आहे.
डॉ. दाहिया म्हणाले, कारोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाच मोदींनी देशातील पाच राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभा घेण्यासाठी तसेच कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सहमती दर्शविल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. देशात जानेवारी 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हाही मोदींनी कोरोना संकटाकडे गांभिर्याने पाहिले नाही.
एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचारी काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठय़ा प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केले आहे, असेही डॉ. दाहिया यांनी म्हटले आहे.









