वाहनधारकांतून संताप : भगदाड पडल्याने तेथे ठेवली फरशी
बेळगाव : शहरात अनेक ठिकाणी असलेल्या सिडीवर्कची दुर्दशा झाल्याने वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. बसस्टॅण्ड जवळील सिग्नलजवळ सिडीवर्कची दुरवस्था झाल्याने धोका निर्माण झाला आहे. सिग्नलजवळच ही परिस्थिती निर्माण झाल्याने ये-जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. एकीकडे स्मार्टसिटी अंतर्गत विकास साधला जात आहे, तर दुसरीकडे मात्र रस्त्यांच्या समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. शहरात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सिडीवर्कचे काम करण्यात आले आहे. मात्र काही सिडीवर्कची दुर्दशा झाली आहे. सिडीवर्कना भगदाड पडल्याने त्याठिकाणी फरशी ठेवण्यात आली आहे. मात्र रात्रीच्या अंधारात अपघात घडू लागले आहेत. आधीच सिग्नलजवळ रस्ता अरुंद आहे. त्यातच सिडीवर्ककडे दुर्लक्ष झाल्याने ये-जा करणे कठीण होऊ लागले आहे. सिग्नल सुटल्यानंतर वाहनधारकांची धावपळ होऊ लागली आहे.









