कॅन्टोन्मेंट बोर्डचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने संताप
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. बेळगाव शहरातून गणेशपूर, बेनकनहळ्ळी, हिंडलगा, उचगाव भागात जाण्यासाठी या रस्त्यांचा वापर होतो. परंतु, रस्त्यांमध्ये पडलेल्या ख•dयांमुळे वाहतूक करणे डोकेदुखीचे ठरत आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सीईओंच्या निवासाशेजारीच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परंतु, याकडे कोणाचेच लक्ष नाही. रस्त्यावरील खडी बाजूला आली असल्याने रात्रीच्यावेळी अपघात होत आहेत. तसेच पावसाच्या पाण्याने सर्वत्र डबकी साचली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून येणे-जाणे अवघड होत आहे. दररोज शेकडो वाहनचालक या रस्त्याने ये-जा करीत असल्याने रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे.









