रस्त्यावर खड्डेच खड्डे , पुलावर पावसाचे पाणी साचल्याने अपघाताची शक्यता
खानापूर : खानापूर शहरातून राजा टाईल्स ते गोवा क्रॉस या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. झालेल्या पहिल्याच पावसात या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. रुमेवाडी क्रॉस येथे पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत. जर येत्या दोन दिवसात मोठा पाऊस झाल्यास हा रस्ता वाहतुकीस बंद होणार हे निश्चित. याबाबत महामार्ग प्राधिकरणाचा बेजबाबदारपणाचा कळस म्हणावा लागेल. आमदार विठ्ठल हलगेकर यांनाही त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. राजा टाईल्स ते गोवा क्रॉस हा रस्ता गेल्या तीन वर्षापासून ख•sमय बनलेला आहे. याबाबत मागील आठवड्यात ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी एक टिप्पर खडी ख•dयात टाकून लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसात रस्त्यात डबक्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. राजा टाईल्स, रुमेवाडी क्रॉस रस्ताच वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मऱ्याम्मा मंदिर ते जांबोटी क्रॉसवरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ख•s पडले आहेत. तसेच हेस्कॉम ते पुलापर्यंत रस्त्यावर ख•s पडल्याने रस्त्यावर डबक्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. तसेच रुमेवाडी क्रॉस ते गोवा क्रॉसपर्यंत संपूर्ण रस्त्याचे अस्तित्व नष्ट झाले असून रस्ता ख•sमय बनला आहे.
गोवा क्रॉसनजीक पाणथळ जागेत शंभर मीटर रस्ता पूर्णपणे खचला आहे. या ठिकाणी प्रत्येकवेळी खडी टाकून रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरती दुरुस्ती करण्यात येते. मात्र पाऊस पडला की, पुन्हा हा रस्ता पूर्णपणे वाहून जातो. त्यामुळे मोरी बांधून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे. तसेच दोन्ही बाजूला शेतवडी असल्याने रस्ता किमान पाच फूट उंच करून कायमस्वरुपी वाहतुकीस योग्य करणे गरजेचे आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना चारचाकी व दुचाकीस्वारांची कसरत होत आहे. या ठिकाणी अपघातही घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मात्र प्रत्येकवेळी खोटी आश्वासने देवून लोकप्रतिनिधी तसेच जनतेची दिशाभूल करत आहेत. राजा टाईल्स ते गोवा क्रॉस रस्ता कोणाच्या अधिपत्याखाली येतो यावर टोलवाटोलवी सुरू आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने पुलावरुन दुचाकी तसेच पादचाऱ्यांना यावरुन प्रवास करणे धोकादायक बनले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने नियोजन होणे गरजेचे आहे. याबाबत आमदार हलगेकर यांनी गांभीर्याने लक्ष घालून रस्त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करून रस्ता वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणी होत आहे.
खासदार हेगडे यांच्याकडून समस्येकडे कानाडोळा
गेल्या पाच वर्षापासून या रस्त्याबाबत अनेकवेळा तक्रारी, रास्तारोकोसह इतर आंदोलने झाली. मात्र रस्ता काही वाहतुकीस योग्य झाला नाही. मागीलवर्षी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी आपली हतबलता फलक लावून व्यक्त केली होती. सातवेळा खासदार असलेले अनंतकुमार हेगडे यांनी तर याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. तालुक्याच्या मतदानावरच हेगडे यांचा विजय ठरलेला असतो. मात्र खानापूर तालुक्याच्या समस्यांबाबत हेगडे यांनी कायमच कानाडोळा केला आहे. त्यामुळे खासदार अनंतकुमार हेगडेंबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.









