तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
सांबरा : बेळगाव-गोकाक या रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनचालकांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी संबंधित खात्याने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी वाहनचालकांतून मागणी होत आहे. बेळगाव-गोकाक हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. कणबर्गी, कलखांब, मुचंडी, चंदगड, अष्टे, खनगावसह इतर गावच्या लोकांचे याच रस्त्यावरून येणे जाणे असते. मात्र सदर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अपघातांचा संभवही वाढला आहे. वास्तविक या रस्त्याची वारंवार देखभाल होणे गरजेचे आहे. तरी संबंधित खात्याने तातडीने रस्त्याची दुऊस्ती करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









