परिसरात दुर्गंधी, महापालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : महाद्वार रोडवरील संभाजी उद्यानासमोर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, महापालिकेने तातडीने कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाजी उद्यानासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा तसाच पडून आहे. मात्र, त्याची उचल झाली नसल्याने त्यावर डास व इतर किटकांचा वावर वाढला आहे. या रस्त्यावरून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला सकाळी व सायंकाळी फिरावयास येत असतात. मात्र, कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने महानगरपालिकेने सदर कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी केली जात आहे.









