मनपा आरोग्य विभागाची कारवाई : पाच हजारांचा दंड वसूल
बेळगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्लास्टिक विरोधी मोहीम सुरूच आहे. गुरुवारी उद्यमबाग येथील एका स्वीट मार्ट आणि दारू दुकानातून प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच याप्रकरणी संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड घालण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेकडून सिंगल युज प्लास्टिक विरोधात कारवाई सुरू आहे. प्लास्टिक विक्री आणि वापरावर बंदी असतानाही अद्यापही प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. आरोग्य विभागाला चालू आर्थिक वर्षात दोन कोटी ऊपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, हे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्याने महानगरपालिका आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर पुन्हा व्यापार परवाने, प्लास्टिकचा वापर व इतर मोहीम तीव्र करण्यात आल्या आहेत. गुऊवारी उद्यमबाग येथील स्वीट मार्टसह दारू दुकानावर कारवाई करून प्लास्टिक ग्लास आणि प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यामुळे संबंधितांवर पाच हजार ऊपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यल्लेश बच्चनपुरी उज्ज्वला बांदिवडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.









