प्रतिनिधी/ बेळगाव
कारगिल विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी माळमारुती पोलीस स्थानकाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते.
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व इतर अधिकारी आणि पोलिसांनी वृक्षारोपण केले. यावेळी माजी सैनिकांबरोबरच त्यांचे कुटुंबीय व स्थानिक नागरिक उपस्थित होते. कारगिल युद्धाच्या रौप्यमहोत्सवी विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 50 रोपटी लावून पोलीस स्थानकात विजयोत्सव साजरा करण्यात आला.









