सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिका वनपरिक्षेत्र वनविभाग सावंतवाडी व मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा या अभियानांतर्गत वृक्षांच्या बियांचे रोपण व वृक्षारोपण उपक्रमामध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यावेळी वनविभाग अधिकारी, नगरपालिका अधिकारी इतर कर्मचारी यांचे स्वागत मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. वनअधिकारी प्रमोद सावंत तसेच उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाची शपथ देण्यात आली. प्रमोद सावंत यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याला नगरपालिकेतर्फे तुळशीचे रोप भेट देण्यात आले. सदर उपक्रमास श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोसले, सौ शुभदा देवी भोसले, श्रीमंत लखम सावंत भोसले, श्रद्धाराजे भोसले, श्री दिलीप देसाई,ॲड शामराव सावंत, जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.









