बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव इलाईटच्या वतीने कणगला औद्योगिक वसाहतीतील जिनाबकूल फोर्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसरात वृक्षारोपण मोहिम राबविण्यात आली.
अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमीका बजावतात आणि लोकांना असंख्य संसाधने प्रदान करू शकतात. शहरांचे वाढलेले तापमान कमी होऊ शकते. ते प्राण्यांसाठी निवारा आणि अन्न प्रदान करतात. त्यामुळे झाडे हि राष्ट्राची, विश्वाची संपत्ती आहेत. त्यामुळे रोटरीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम हाती घेतले आहे.
दरम्यान, या वृक्षारोपण मोहिमेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि कार्यक्रमस्थळी केलेल्या योग्य नियोजनाबद्दल संतोष केळगेरी आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व रोटेरियनचे अध्यक्ष सीए जयकुमार पाटील, सचिव सीए आदर्श मत्ताrकोप यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन मनोज आणि संतोष यांनी केले.