आचरा : प्रतिनिधी
आचरा येथील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने आचरा पोलीस स्टेशन येथे आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या हस्ते व शाखेचे शाखाधिकारी श्री राजेंद्र मोरवेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.
महिलेचा जीव वाचवणाऱ्या आचरा पोलिसांनाही केले सन्मानित
05 जुलै रोजी आचरा भंडारवाडी येथील महिलेवरती मारुती मंदिर जवळ असलेले आंब्याचे झाड कोसळले होते ती महिला त्यात अडकून जखमी झाली होती महिलेला बाहेर काढण्यात आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर तसेच पोलीस कर्मचारी अक्षय धेंडे, मनोज पुजारे व त्यांच्या संपूर्ण टीमने महत्वाची भूमिका बजावली होती. म्हणूनच लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा आचरा यांच्या वतीने आचरा पोलिसांची भेट घेत त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करत त्याना सन्मानित करण्यात यावेळी शाखेचे शाखाधिकारी श्री राजेंद्र मोरवेकर ,श्री विजय मिराशी व विनोद आचरेकर उपस्थित होते.









