धामणे/वार्ताहर
बेळगाव प्रादेशिक वन विभागाच्यावतीने जुने बेळगाव ते धामणे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येत आहे. शनिवार दि. 17 पासून या वृक्षलागवडीला सुरुवात झाली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला रस्त्याच्या दोन्ही बाजुस बेळगाव वन विभागातर्फे खड्डे मारले होते. त्याच खड्डेयातून शनिवारी सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड करण्यात येत आहे. जुनेबेळगाव ते धामणे गावापर्यंत एकूण 1250 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. याचबरोबर ही रोपटी जगविण्यासाठी वनविभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. या वृक्षांच्या संगोपनासाठी वनखात्यातर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. या वृक्षलागवडीमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









