रानटी जनावरांना खाद्य मिळावे यासाठी अनोखा उपक्रम : गेल्या तीन वर्षांपासून सुऊ आहेत प्रयत्न
वाळपई : सालेली गडावर नैसर्गिक साधन संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पदभ्रमण मोहिमेसाठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. एकेकाळी या गडावर विपुल अशी जंगल संपत्ती होती. या गडाच्या सभोवताली अधिवास करणाऱ्या रानटी जनावरांना फळांचे खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सालेली येथील निसर्गप्रेमी तऊण या भागांमध्ये फळझाडांची लागवड करत आहेत. आजही सालेली गावातील तऊणांनी सुमारे 100 झाडे लावली. सालेली गावासाठी सालेली गड भूषण आहे. या गावाचे व गडाचे वेगळे नाते निर्माण झालेले आहे. गोवा मुक्ती व भारत स्वतंत्र्याचा इतिहास या गडाच्या माध्यमातून उदयास आलेला आहे. गड नैसर्गिक साधन संपत्तीने भरलेला आहे. गडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात काजू बागायतीच्या लागवडी आहेत. मात्र गडावर रानटी जनावरांना खाद्य उपलब्ध होत नसल्यामुळे रानटी जनावरे लोकवस्तीत येत असतात. त्यांच्या खाद्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी या गावातील तऊणांनी गेल्या तीन वर्षापासून एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे, असे यावेळी तरुणांनी सांगितले.
यंदा आंबा, फणस, बदाम, वडाचे झाड, भिरंड, जांभूळ, सीताफळ, ओव्हळ, कडुलिंब, पेरू अशा 100 फळझाडांची लागवड केली. पावसाळी मौसमामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे उत्पत्ती व्हावी यासाठी 100 सीडबॉलची निर्मिती केली होती. हे सीडबॉल या डोंगराच्या विविध ठिकाणी टाकले. यामुळे या सीडबॉलच्या माध्यमातून झाडे ऊजणार आहेत, असे तऊणांनी यावेळी सांगितले. यामध्ये लक्ष्मण गावस, निलेश फोगेरी, रघुनाथ गावकर, सिद्धनाथ गावकर, ऊपेश गावकर, पुती गावकर, नारायण गावकर, चेतन गावकर, श्रेयश गावकर, रोहित गावकर, सिद्धेश नावेलकर यांचा समावेश आहे. आज दिवसभर या तऊणांनी गडावर निसर्गाचे रक्षण व पर्यावरणासाठी महत्त्वाचे योगदान दिले.









