प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स प्राईड सहेलीतर्फे संस्थापक नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त केएसआरपीच्या आवारात 100 रोपे लावण्यात आली. या उपक्रमासाठी कमांडर हमजा हुसेन यांनी सहेलीला रोपे लावण्यासाठी जागा दिली आहे. सहेलीच्या सदस्यांनी मच्छेपासून पिरनवाडीपर्यंत चालत जाऊन ही रोपे लावली.
सदस्यांनी बसप्पा कामतगी यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे खणून झाडे लावली. प्रामुख्याने औषधी वनस्पती आणि फळांची झाडे लावण्यात आली. सदस्यांनी जे रोप लावले आहे त्याचे झाड होईपर्यंत प्रत्येकांनी त्याची काळजी घ्यावी, असे आवाहन अध्यक्षा आरती शहा यांनी केले.
रिया व प्राची शहा यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात सहेलीच्या सदस्या व अन्य सदस्य सहभागी झाले होते. जिगना शहा यांनी आभार मानले.









