वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये रोप लागवडीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. पूर्व भागातील कणबर्गी, कलखांब, मुचंडी, बसवण कुडची, निलजी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, चंदगड, अष्टे आदी भागांमध्ये सध्या रोप लागवडीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे रोप लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांची रोप लागवड करण्यासाठी धडपड सुरू आहे. पूर्व भागामध्ये धूळवाफ पेरणी व त्यापाठोपाठ रोप लागवडही करण्यात येते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये रोप लागवडीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. रोप लागवड केल्याने भांगलणीच्या कामाला फाटा बसतो. त्यामुळे शेतकरी वर्ग रोप लागवडीकडे वळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पूर्व भागांमध्येही पावसाचे प्रमाण वाढल्याने पूर्व भागातील बळळारी नाल्यासह इतर नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.









