प्रतिनिधी /बेळगाव
पर्यावरण दिन आणि नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त जायंट्स सखीतर्फे शाहूनगर येथील मारुती मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका रेश्मा पाटील उपस्थित होत्या. त्यांच्यासह अध्यक्षा चंद्रा चोपडे, प्रवीण पाटील व इतर पदाधिकाऱयांच्या हस्ते आंबा, जांभूळ, गुलमोहर, पेरू, बेलपत्र या वीसहून अधिक मोठय़ा झाडांसोबत मंदिरात रोजच्या पुजेसाठी लागणाऱया जास्वंदी, मोगरा व इतर फुलझाडांच्या रोपांची सुद्धा लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण करण्यासाठी लागणाऱया खड्डय़ांची खोदाई रेश्मा पाटील यांच्यातर्फे करण्यात आली. जायंट्स सखीच्यावतीने रोपे उपलब्ध करून देण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, सुलक्षणा शिन्नोळकर, माजी अध्यक्षा नीता पाटील, शीतल पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सखीच्या सदस्या उपस्थित होत्या.









