कृषीमंत्री रवी नाईक यांचे तरुणाना आवाहन
पणजी : असंख्य औषधी गूणधर्म असलेल्या ’ब्लॅक राईस’ पद्धतीच्या तांदळाला प्रचंड राज्यासह विदेशातही मोठी मागणी असून तब्बल 400 रुपये किलो एवढ्या महाग दराने हा तांदूल विकला जातो. त्यामुळे तरुणांनी या तांदूळ उत्पादनात लक्ष घातल्यास त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो, असे मत कृषीमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केले. नुकत्याच पणजीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. या तांदळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास तो परदेशात निर्यातही करता येईल, असे ते म्हणाले. सध्या अनेक तऊणांनी काळा भात पिकवायला सुऊवात केली आहे. मात्र ते प्रमाण वाढले पाहिजे, अधिकाधिक तऊणांनी या लागवडीत लक्ष घातल्यास गोव्यास भेट देणारे परदेशी पर्यटक ते खरेदी तर करतीलच त्याशिवाय जादा उत्पादन झाल्यास ते निर्यातही करता येतील, काळ्या तांदळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. असे नाईक म्हणाले.









