अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणातील सर्व प्रशासकीय विभागांची बैठक अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, डीवायएसपी घनश्याम आढाव, तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण दैवज्ञ भवन येथे पार पडली. यावेळी उपस्थित व्यापारी, पदाधिकारी यांच्या सूचना जाणून घेत उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व प्रशासकीय विभाग, व्यापारी संघटना, सार्वजनिक गणेश मंडळ, शांतता मोहल्ला कमिटी, रिक्षा संघटना, राजकीय पदाधिकारी, नागरिक यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करणे. बाजार व्यवस्थापन व बैठक व्यवस्था, मोठ्या वाहनांना सागरी महामार्गावर उभे राहण्याबाबत व्यवस्था, गणपती आगमन मार्ग गणपती विसर्जन मार्ग येथील व्यवस्था, शहरातील खड्डेमय रस्ते वरील खड्डे बुजवणे, रस्त्यांच्या बाजूची झाडी तोडणे यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच उपायोजना करण्याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.









