वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी एका वायु अपघातात 3 लोकांचा बळी गेला आहे. गुरुवारी एक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. शुक्रवारी एक छोटे विमान मार्गावर पडल्याने 3 लोकांचा बळी गेला आहे. तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. हे खासगी विमान बोका रेटन राष्ट्रीय महामार्गावर कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातात जखमी झालेला व्यक्ती विमान कोसळले तेव्हा या महामार्गावर होता. विमान त्याच्याजवळच कोसळल्याने तोही आगीच्या ज्वाळांमध्ये सापडला. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली. गुरुवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात तीन बालकांसह सहा व्यक्तींचा मृत्यू झाला होता. हेलिकॉप्टरने हवेत उ•ाण केल्यानंतर केवळ 18 मिनिटांमध्येच त्याचा भूमीशी संपर्क तुटून ते हडसन नदीत कोसळले होते, अशी माहिती देण्यात आली.









