न्यूयॉर्क :
अमेरिकेच्या ऑरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. यानंतर त्वरित पावले उचलत विमानातील 282 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. प्रवाशांना इमर्जन्सी स्लाइड्सद्वारे विमानातून बाहेर काढण्यात आले. अटलांटा येथे जाणारे विमान धावपट्टीवरून रवाना झाले असतानाच एका इंजिनने पेट घेतला होता. याप्रकरणी एफएएने चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेत कुणीच जखमी झाले नसल्याचे समोर आले आहे.









