पुणे / प्रतिनिधी :
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपद्धतीचे अचूक नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या सुकाणू समितीच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पाटील यांचे अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे निर्देश दिले.
पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांमध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी परीसस्पर्शसारखी योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. विद्यार्थी हिताला अधिक प्राधान्य देऊन विद्यापीठे व महाविद्यालयांनी मेजर, मायनर व जेनेरिक विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम रचना, ऍकॅडेमिक बँक पेडीट्सची नोंदणी, प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप यांचे योग्य नियोजन करावे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.
अधिक वाचा : अवकाळी अन् उन्हाळा एकत्रच








