ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री पीयुष गोयल आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची अचानक हकालपट्टी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने ही कारवाई केली आहे.
अनुज गुप्ता हे 2016 पासून पीयुष गोयल यांचे ओएसडी म्हणून काम पाहत होते. त्यांना 2021 मध्ये मुदतवाढ देण्यात आली होती. तर देवांशी विरेन शाह या स्मृती इराणी यांच्या ओएसडी होत्या. ओएसडीचा कार्यकाळ पाच वर्ष किंवा मंत्र्याची इच्छा असेपर्यंत असतो. पण या दोन्ही मंत्र्यांच्या ओएसडींना मुदतपूर्व कमी करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या ओएसडींच्या नियुक्त समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोनच सदस्य आहेत. या समितीनेच हा निर्णय घेतला आहे. या कारवाईमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.









