दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका : पाणी भरल्यामुळे अंदाज चुकून अनेकजणांचा अपघात
डिचोली : डिचोली शहरातील वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी डिचोली शहरात हाती घेण्यात आलेल्या भूमीगत वीजवाहिन्या घालण्यासाठी जागोजागी खोदण्यात आलेले ख•s बुजविले न गेल्याने सध्या धोकादायक बनले आहे. सध्या पावसामुळे या ख•यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वारांना अपघातही झाले आहेत. मोठा अपघात होऊन कोणाचाही जीव जाण्यापूर्वी हे ख•s बुजवावे, अशी मागणी लोकांकडून केली आहे.शहरात हे भूमीगत वीजवाहिन्यांचे काम हाती घेण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला ख•s मारण्यात आले होते. या ख•dयांमधून विशेष यंत्राद्वारे जमिनीच्या खालून केबल घालण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. सदर ख•s बरेच खोल खोदण्यात आले होते. हे काम आटोपल्यावर सदर खड्ड्यांमध्ये माती घालून ते वरचेवर बुजविण्यात आले होते. पावसापूर्वी सदर ख•s स्पष्टपणे दिसून येत होते. त्यामुळे ते पावसापूर्वी बुजविणे आवश्यक होते. मात्र पाऊस सुरू झाल्यानंतरही सदर ख•s बुजविण्यात आलेले नाही. डिचोलीहून मुळगाव जाण्याच्या मार्गावर डाव्या बाजूने सदर रांगेत ख•s आहेत. या ख•यांमधील माती पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने ते अधिकच खोल झाले आहेत.बोर्डे भागात मुख्य महामार्गावर असलेल्या या ख•यांमध्ये दुचाकीस्वारांना अपघातही घडलेले आहेत. तर अनेकजण अटघातातून बचावले आहेत. या रस्त्यावर वेगवान वाहनांची वर्दळ चालूच असते. या ख•dयांमुळे गंभीर अपघातही घडण्याची भीती आहे. त्यासाठी सदर ख•s लवकरात लवकर बुजविण्यात यावे, अशी मागणी मुळगावचे माजी पंच सदस्य महेश्वर परब यांनी केली आहे.









