प्रतिनिधी/हुबळी: वाणिज्यनगरी हुबळीमध्ये कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. एका पाळीव कुत्र्याने मुलावर हल्ला केला.
हुबळी येथील बंकापुरा चौकाजवळील पाटील गल्लीत पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
पवन अनिल दोडामणी नावाचा असे त्याचे नाव आहे. ट्यूशनला जात असताना कुत्र्याने अचानक हल्ला चढविला. गुरुसिद्धप्पा चन्नोजी यांच्या कुत्र्याने या मुलावर हल्ला केला असून मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. मुलाला उपचारासाठी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुलाची ही अवस्था पाहून पालकही हैराण झाले आहेत. बेंडीगेरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना आहे.