कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नांमुळे संभाजी ब्रिगेडने भव्य खड्डे फोटो स्पर्धा 2022 चे आयोजन केले आहे. प्रथम पारितोषिक गुहाटीच्या रस्त्यांचे असल्याचे फोटो, पारितोषिक सुरत मधील रस्त्यांचे फोटो आणि तृतीय क्रमांक हा गोवा शहरातील रस्त्याचे फोटो असे ठेवले आहे. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेच्या संपूर्ण शहरात होत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे संघटक निलेश सुतार यांनी दिली.












