31 टक्के लोकांना पायी प्रवास करणे पसंत , उच्चभ्रू लोक देखील यात सामील
ब्रिटनच्या रस्त्यांवरील गर्दी कमी करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी पायी चालण्याचा ट्रेंड वाढत आहे. सरकार देखील याला प्रोत्साहन देत आहे. काही मुख्य मार्गांवर पायी चालणाऱयांना प्रोत्साहित करण्यासाठी पेंटिंग्स देखील तयार करण्यात आली असून ती पायी चालणाऱयांचे मनोबल वाढवून त्यांना प्रेरित करत आहे.
बर्मिंगहमचा मुख्य रस्ता चालण्यासाठी योग्य नाही. येथे धूर आणि गोंगाट निर्माण करणाऱया कार आणि लॉरींचे प्रमाण अधिक आहे. फुटपाथ बस शेल्टर ठरले असून येथे डिजिटल जाहिरातींचे बोर्ड लागल्याने चालणे अवघड ठरले असल्याचे किंग्स हीथ भागाचे प्रतिनिधित्व करणाऱया कौन्सिलर लीजा ट्रिकेट यांनी म्हटले आहे. परंतु किंग्स हीथ आणि पूर्ण ब्रिटनमध्ये सरकार पायी चालणाऱयांना प्रोत्साहित करत आहे. महामारीमुळे घडून आलेल्या महान बदलांपैकी हा एक असल्याचे त्या म्हणाल्या.

2019 आणि 2021 दरम्यान लोकांनी पायी प्रवासावर भर दिला आहे. सर्वप्रकारच्या प्रवासांपैकी 26-31 टक्क्यांपर्यंत पायी प्रवासाचे प्रमाण अधिक होते. कार आणि बाइकने प्रवास करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. एक मैलापेक्षा अधिक पायपीट करण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. उच्चभ्रू लोक हे पूर्वी गरीबांपेक्षा कमी चालायचे, परंतु आता त्यांनीही अधिक प्रमाणात पायी प्रवास केला आहे.
काही झोन्समध्ये सायकल चालविण्यापेक्षा पायी चालण्यास प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे लंडनमधील एका अध्ययनात आढळून आले आहे. मे 2020 मध्ये सरकारने पायी प्रवास करणाऱया लोकांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली होती. पायी चालणाऱयांसाठी सुविधापूर्ण मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले होते.
सरकारकडून हा प्रयत्न ब्रिटनला 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य करण्याच्या दिशेने होत आहे. पायी चालणाऱया लोकांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत. या सर्व उपक्रमांमुळे ब्रिटनमध्ये आगामी काळात पायी चालणाऱयांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये सर्वाधिक लोकांनी पायी प्रवास केला आहे.









