चार महिन्यांपासून गळती : दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : मजगाव येथील उर्दू प्राथमिक शाळेसमोर मुख्य रस्त्यावर मुख्य पाईपलाईनला गेल्या चार महिन्यापासून गळती सुरू आहे. पण महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पिण्याचे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. मजगाव येथे 8 ते 10 दिवसातून एकदा पिण्याचे पाणी सोडत आहेत. त्यामुळे आतापासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. यामध्ये महापालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठा अल्प असल्याने महिलांची तारांबळ उडत आहे. यामध्ये मुख्य जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागल्याने ते दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित मुख्य जलवाहिनी दुरुस्त करून हजारो लिटर पाण्याची नासाडी थांबवावी व नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.









