scrub:स्क्रबिंगमुळे त्वचा अधिक तेजस्वी होते. त्याचबरोबर स्क्रबिंगमुळे त्वचा निरोगी राहण्यासोबतच तेल, मुरुम आणि चट्टे यापासून मुक्त होण्यास मदत होते. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी एक प्रभावी स्क्रब घेऊन आलो आहोत. हे स्क्रब बनवण्यासाठी फक्त पिंक सॉल्ट आणि गुलाबपाणी या दोन घटकांची आवश्यकता आहे. पिंक सॉल्ट आणि गुलाबपाणी एकत्रितपणे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
हे स्क्रब बनवण्यासाठी 1 टीस्पून पिंक सॉल्ट, 7 ते 8 थेंब गुलाबजल आणि 1 चमचा मध घ्या. एका लहान भांड्यात प्रथम पिंक सॉल्ट आणि मध घाला. नंतर त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाका.आता हे सर्व साहित्य चांगले मिसळा आणि स्क्रब तयार करा. हे स्क्रब तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 5 ते 10 मिनिटे बोटांच्या मदतीने तुमच्या चेहऱ्याला हळूवारपणे मसाज करा.त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
या स्क्रबचा त्वचेला होणारा फायदा
हिमालयीन मीठ किंवा गुलाबी मीठ हे सर्वोत्तम डिटॉक्सिफायर आहे. हे त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकते आणि त्वचेचे आरोग्य राखते. पिंक सॉल्टचा आणखी एक फायदा म्हणजे ते दुर्गंधींचा प्रतिकार करते. त्यामुळे शरीराची दुर्गंधी कमी करण्यात मदत होते.गुलाबपाणी आणि गुलाबी मीठ त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करतात. यासोबतच त्वचेवर साचलेली घाण साफ होते व त्वचेची रंध्रे घट्ट होतात. हे स्क्रब तुमची त्वचा दीर्घकाळ हायड्रेटेड ठेवू शकते, तसेच त्वचेला नैसर्गिक चमक देखील देते.
परंतु लक्षात ठेवा की जास्त स्क्रबिंग त्वचेसाठी खूप हानिकारक असू शकते. दररोज फेशियल किंवा बॉडी स्क्रबिंग करू नका. जरी स्क्रब नैसर्गिकरित्या तयार केला गेला असेल तरीही त्याचा अतिवापर त्वचेसाठी नुकसानकारक आहे. तुम्ही आठवड्यातून दोनदा हे स्क्रब वापरू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









